भजनी मालिका
← भजनांकडे परत

हमामा पोरा हमामा । घुमरी वाजे घुमामा ॥ध्रु

hamama pora hamama | ghumari vaje ghumama ||dhru

हमामा पोरा हमामा । घुमरी वाजे घुमामा ॥ध्रु॥ घुमरिचा नाद कानीं । घुमरी घालूं रानीं । रानीं सीतल छाया । मेली तुझी माया । मायेचें घर दुरी । तुज मज कैंची उरीरे पोरा ॥१॥ उरी नाहीं तुज । मजसी मांडिले जुंझ । जूंझी अहंकार ढळे । कल्पना समूळ गळे । गळतां गळतां पाहिली । कान्होबा चरणीं राहिलीं । कान्होबा पाहे दिठी । तुज मज पडिली मिठीरे पोरा ॥२॥ मिठी मिठी करी पाहासी । आतां कोठें राहासी राहता ठावो येकु । फ़टितो तुझा लेंकु । लेंकु गाइ राखे । बाप गोरसु चाखे । चाखतां घेतली गोडी । तोचि फ़ांसा तोडीरे पोरा ॥३॥ पोरा एक माझी गोठी । राग न धरी पोटीं । रांगे काम नासे। अंहकारे बोंचा वासे ॥ वासिले रावणें डोळे । भेणें द्वैत कंस पळे । पळतां पळतां लागला पाठीं । तुज मज आतां गोठीरे पोरा ॥४॥ पोरा गोठी करी ऐसी । संतासि मानेल तैसी । बापरखुमादेविवरु ध्यासी । तरि वरिल्या गांवां जासीरे पोरा ॥५॥