भजनी मालिका
← भजनांकडे परत

हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा

ha ge majha anubhav | bhaktibhav bhagyacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥१॥ केला ॠणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥ घालोनियां भार माथा । अवघी चिंता वारली ॥२॥ तुका म्हणे वचनासाठी । नाम कंठीं धरियेले ॥३॥