भजनी मालिका
← भजनांकडे परत

हा गे हाचि आतां लाहो । माझा अहो विठ्ठला

ha ge hachi atan laho | majha aho viththala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हा गे हाचि आतां लाहो । माझा अहो विठ्ठला ॥१॥ दंडवत दंडवत । वेगळी मात न बोलें ॥ध्रु.॥ वेगळाल्या कोठें भागें । लाग लागें लावावा ॥२॥ तुका म्हणे केल्या जमा । वृत्ति क्षमा भाजूनि ॥३॥