भजनी मालिका
← भजनांकडे परत

हा गे आलों कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे

ha ge alon koni mhane budatiya | tenen kiti taya bal chadhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हा गे आलों कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥१॥ तुम्ही तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥ भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥२॥ तुका म्हणे दिली चिंतामणीसाठी । उचित कांचवटी दंडवत ॥३॥