भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुणे सकुमार सावळे

gune sakumar savale

गुणे सकुमार सावळे । दोंदील पहाती पां निराळें । केवीं वोलळे गे माये । सुख चैतन्याची उंथी ओतली । ब्रह्मांदिका न कळे ज्याची थोरवी । तो हा गोवळीयाच्या छंदे क्रीडतु । साजणी नवल विंदान न कळे माव रया ॥ डोळां बैसले हृदयीं स्थिरावले । मन नुठी तेथून कांही केल्या ॥धृ॥ सच्चिदापदीं । पदाते निर्भेदी । निजसुखाचे आनंदी । माये क्रीडतुसे ॥ तो हा डोळीया भीतरी । बाहिजु अभ्यंतरी । जोडे हा उपावो किजो रया ॥ गुणाचे पैं निर्गुण । गंभीर सदसुखाचे उदार । जे प्रकाशक थोर । सकळ योगाचे ॥ आनंदोनी पाहें पां साचे । मनी मनचि मुरोनी राहे तैसें । बापरखुमादेविवरा विठ्ठलें । की मुसेमाजी अलंकार मुराले । श्रीगुरु निवृत्तीने दाविलें सुख रया ॥