भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोजिरें श्रीमुख चांगलें । ध्यानीं मिरवले योगीयांच्या

gojiren shrimukh changalen | dhyanin miravale yogiyanchya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
गोजिरें श्रीमुख चांगलें । ध्यानीं मिरवले योगीयांच्या ॥१॥ पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं । वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥ राई रखुमाई सत्यभामा नारी । पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥ वैजयंती माळ किरीट कुंडलें । प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥