भजनी मालिका
← भजनांकडे परत

घोंटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हातीं । मुक्तं आत्मिस्थती सांडवीन

ghontavin lal bramhadnyanya hatin | muktan atmisthati sandavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घोंटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हातीं । मुक्तं आत्मिस्थती सांडवीन ॥१॥ ब्रम्हीभूत होते काया च कीर्तनीं । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥ध्रु.॥ तीर्थ भ्रामकासी आणीन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥२॥ सांडवीन तपोनिधा अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन ॥३॥ भक्तीभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥४॥ धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां । भाग्य आह्मीं तुका देखियेला ॥५॥