भजनी मालिका
← भजनांकडे परत

घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना

ghongaden nelen sangon mi kona | dubalen majhen nanit mana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥१॥ पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥ सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥२॥ घोंगडियाचा करा बोभाट । तुका म्हणे जंव भरला हाट ॥३॥