भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेऊनियां चक्र गदा । हाचि धंदा करी तो

gheuniyan chakra gada | hachi dhanda kari to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घेऊनियां चक्र गदा । हाचि धंदा करी तो ॥१॥ भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥ अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥२॥ तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥३॥