भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिलाषी

gheun naye taisen dan | jyachen dhan abhilashi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिलाषी ॥१॥ तो ही येथें कामा नये । नरका जाय म्हणोनि ॥ध्रु.॥ विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥२॥ तुका म्हणे दांभिक तो । नरका जातो स्वइच्छा ॥३॥