भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि म्हणें हरी

gaun nenen kala kusari | kan dharoni mhanen hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि म्हणें हरी ॥१॥ माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥ मज हंसतील लोक । परि मी गाईन निःशंक ॥२॥ तुझे नामीं मी निर्लज्ज । काय जनासवें काज ॥३॥ तुका म्हणे माझी विनंती । तुम्ही परिसा कमळापती ॥४॥