भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाऊं नाचू विठो तुज तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद

gaun nachu vitho tuj tujha karun anuvad | jikade pahen tikade sarvamay govind

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाऊं नाचू विठो तुज तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥ आनंद रे विठोबा जाला माझे मनीं। देखिले लोचनीं विटेसहित पाउले ॥ध्रु.॥ न करीं तपसाधन रे मुक्तीचे सायास । हाचि जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥२॥ तुका म्हणे आम्हां प्रेमा उणें तें काई । पंढरीचा राणा सांटविला हृदयीं ॥३॥