भजनी मालिका
← भजनांकडे परत

गर्भीं असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा

garbhin asatan bala | kon pali tyacha lala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गर्भीं असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥१॥ कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ध्रु.॥ सर्प पिलीं वितां चि खाय । वांचलिया कोण माय ॥२॥ गगनीं लागला कोसरा । कोण पुरवी तेथें चारा ॥३॥ पोटीं पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥४॥ तुका म्हणे निश्चळ राहें । होईल तें सहज पाहें ॥५॥