भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई

gain te lila charitra pavade | rakhile sanvagade sahit gai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥ चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ध्रु.॥ मोहिल्या गोपिका पांवयाच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊं ॥२॥ मायबापा लाड दाखविलें कौतुक । तें या आणूं सुख अंतरासी ॥३॥ निर्दाळिले दुष्ट भक्तां प्रतिपाळी । ऐसा म्हणों बळी आमुचा स्वामी ॥४॥ तुका म्हणे सरसी असों येणें बोधे । जाणोनि संबंधें सर्वकाळ ॥५॥