भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणें

gadhavache angin chandanachi uti | rakhesave bheti keli tenen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणें ॥१॥ सहज गुण जयाचीये देहीं । पालट तो कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥ माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी थुंकोनि टाकी ॥२॥ तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवीत आपुलें मत ॥३॥