भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकांति बाळा । कीं सोहंसुखशयन वेळा । पाहे चरणकमळा । सुंदराचे

ekanti bala | kin sohansukhashayan vela | pahe charanakamala | sundarache

एकांति बाळा । कीं सोहंसुखशयन वेळा । पाहे चरणकमळा । सुंदराचे ॥ तेथें अरुण उदेला । कीं सुमन प्रगटला । कमळणी जाला । अंतरीं विकासु ॥ तें चरण कमळकेवळ । भक्त आळिउळ । सेविती सकळ । योगिजन । तेणें तृप्त जालें । कीं ह्रदय वोसंडले । म्हणोनि वाहावलें । ज्ञानडोहीं । तेचि ते परमानंद गे माय ॥१॥ न संगवे माय । परा पारुषली । दोंदिल दृष्टी जाली देखणेंपणें ॥ मनाचा अंकुर उगीच मुराला । तो कृष्णचि होऊन ठेला । अनुभविया ॥ध्रु०॥ तये पदांघ्रीचे रज । तेणें तृप्ति वो सहज । वरि त्रिवेणी ऊर्ध्व व्रज । मज पाहतां ॥ ते तंव रेखा । वरि सखोल देखा । त्यावरी वोळले पीयूषपाणी ॥ तयेचेनि मागें । उध्दरणें जगें । म्हणोनि संतसंगें । तया सोई ॥ ते दोहीं भागीं । विस्तारलें जगीं । म्हणोनि तया भागीं । चरणांगुष्ठ ॥ दृष्टीचा डोळा । न निवडेच बाळा । तेथें जाला एकवेळा । मुनिजनां गे माये ॥२॥ तेथें बिंबलीं नखें । कीं विवळणी विशेखें । काळेपणाचेनि द्वेषें । वाहावलीं पुढां ॥ उगमींच संचले । कीं वियोगें वाहावले । पुनरपि जडले । कृष्णपदीं ॥ गंगा अंगुष्ठधार । कीं वांकिचा बडिवार । तेथें सप्तही स्वर । उमटताती ॥ स्वरुपीं रमली । म्हणोनि अधोमुख जाली । शोभती घाघुरली । पायीं प्रभावळी गे माये ॥३॥ तंव ते निजानंद भरितें । नेणती आणिकांतें । विसरली आपणातें । हास्यवदनें ॥ म्हणती नेति नेति गर्जना । कीं माणिका खेवणा । घोट्या अनुमाना । बाळसूर्यो । पोटरिया निवाळा । कीं उभलिया सरळा । जानुद्वय सोज्वळा । उच्चस्तंभ ॥ उंच युगुळ कटीं । माज सामावे मुष्टीं । सोहं समदृष्टी । दोहीं भांगीं गे माये ॥४॥ वरि वेढिला पिंवळा । कीं मिरवे सोनसळा । कीं कल्पतरु फ़ुलेला । नाभिस्थानीं ॥ तेथें वेधु गोपिबाळा । कीं अंतरीं सांवळा । पालवी मेखळा । अभिळाखिया ॥ तेथें मदनु गूढपणें । रतिशये रमणे । दुजे अनुभउ अनुभवणें । न निवडे केंही ॥ सखोल नभमंडळ । तै ब्रह्मस्थान केवळ । कैसे पाहाले विवळ । तेथें जगामागी गे माये ॥५॥ रोमराजवेळा । कीं वेणी एकवळा । दावि निराळा । उदरामध्यें ॥ ह्रदय निर्मळ । तेथें ध्येय ध्यान केवळ । वरि चरणकमळ । द्विजोत्तम ॥ वैजयंति माळा । शोभतसे गळां । उभलेनि वक्षस्थळा । उभारली ॥ सरळ बाहुदंड । न कळे कानवड । अंगोळिया धडफ़ुड । खुणा दावितो गे माये ॥६॥ ऐसा खुणा दावितसे एका । तंव दावी अनेका । अंगोळिया देखा । दशावतावरी ॥ नखाची मंडणी । तेथें तेज तारांगणी । होत असे प्रवणी ॥ त्रिमिर द्वैत ॥ शुक्लपक्ष । कीं अंतरीं लक्ष । सारुनियां साक्ष । दृशदिसर्वी ॥ एकाएकीं संचरे कीं माजिघरीं दुसरे । स्वयें एकसरे । नवल चोज गे माये ॥७॥ तेथ सानुसान स्वर । दोहिलें अंबर । हास्यवदन सुंदर । पावया छंदें ॥ निमासुरा नेटका । न कळे ब्रह्मादिका । वेधुनि गोपिका । मोहियलें जग ॥ समदृष्टी नासापुटीं । नेत्रद्वय निघाले भेटी । रविशशि कोटी । लोपले तेथें ॥ मना मारुनि मेळा । कीं कुंडलें शोभे किळा । तेथें जाला एकवळा । योगिजना गे माये ॥८॥ व्योमींचा मणीं । तया तळीं सहस्त्रफ़णी । तो लाधला निर्वाणी । आराधितां ॥ शेष वर्णिता श्रमला । ह्मणोनि शरण आला । शयन होऊनि ठेला । तया तळीं ॥ ऐसी सुमन सेजा । कीं मवाळपण बरविया वोजा । तेथें रातली रमा भाजा । न निवडे केंही ॥ ऐसा झाला एकवळा । शेष म्हणे दैव आलें फ़ळा । आतां पाहेल सुनीळा । कायें सेज माजी ॥९॥ ऐसयाचें ध्यान । जरि हें न करी मन । तरीच पतन । जन्ममरण ॥ चिंता साठीं फ़ेडी । कीं उभारुनियां गुढी । स्वयें सुखाचिया आवडी । कां सांडितासी ॥ आतां करुं पाहे ध्यान । तरि सहजेंचि उन्मन । म्हणोनि समाधान । होय जीवा ॥ तीर्थ व्रत तप दान । जरी न करी हें मन । तरि सहजचि साधन । गोपिनाथु ॥१०॥ तीर्था जातां सायासी । तूं काय एक देसि । म्हणोनि स्तविलासी । बहुतांपरी ॥ तंव परापश्यंती मध्यमावैखरी । या युक्तिनो बोलवेसी ॥ निवृत्ति म्हणे लीळा । विश्वव्यापक निराळा । पाहे उघडा डोळां परब्रह्म ॥ ज्ञानदेवा मीपणीं । निवृत्ति ऐक्य चरणीं । सरो दुजेपणीं । हांव जीवा ॥११॥