भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकांतांचे सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि

ekantanche sukh dei maj deva | aghat ya jiva chukavuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकांतांचे सुख देई मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥१॥ ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ध्रु.॥ मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज गोडी देई देवा ॥२॥ कीर्ती ऐकोनियां जालों शरणांगत । दासाचें तूं हित करितोसी ॥३॥ तुका म्हणे मी तों दीन पापराशी । घालावें पाठीशी मायबापा ॥४॥