भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें

ekanchin uttaren | god amrut madhuren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥१॥ ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ध्रु.॥ एकांचीं वचनें । कडु अत्यंत तीक्षणें ॥२॥ प्रकाराचें तीन । तुका म्हणे केलें जन ॥३॥