भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक वेळ केलें रितें कलेवर । आंता दिली थार पांडुरंगा

ek vel kelen riten kalevar | anta dili thar panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक वेळ केलें रितें कलेवर । आंता दिली थार पांडुरंगा ॥१॥ पाळण पोषण नलगे ते सोई । देहाचें तें काई सर्वभावें ॥ध्रु.॥ माझिया मरणें झाली हे वसति । लागली ते ज्योती अविनाश ॥२॥ झाला ऐसा एका घायें येथें नाहीं । तुका म्हणे कांहीं बोलों नये ॥३॥