भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा

ek pahatasan ekanchin dahanen | savadh tya gunen kan re navha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥१॥ मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥ मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तोचि वरी माप भरी ॥२॥ तुका म्हणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥३॥