भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक पाहातां दुजें गेलें

ek pahatan dujen gelen

एक पाहातां दुजें गेलें । शेखीं पाहातां सर्व शून्य जालें ॥१॥ पाहातां तयाचा विचारु । निवृत्ति जाणे तो श्रीगुरु ॥२॥ एक मूळ एक आदि । शून्य मांडिली उपाधी ॥३॥ निवृत्ति दासाचें बोलणें । जाणे मीपणा उमाणें ॥४॥