भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं

dyal thav tari rahen sangati | santanche pangati payampashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥ आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥ध्रु.॥ सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन ॥२॥ नामदेवापायीं तुकया स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥३॥