भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें

dya ji majha vicharoniyan vibhag | na khande ha lag ahachapanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥१॥ किती नेणों तुम्हां साहाते कटकट । आम्ही च वाईट निवडलों ते ॥ध्रु.॥ करवितां कल्हें जिवाचियेसाटीं । हे तुम्हां वोखटीं ढाळ देवा ॥२॥ तुका म्हणे धीर कारण आपुला । तुह्मीं तों विठ्ठला मायातीत ॥३॥