भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्लभरे दुर्लभरे दुर्लभु संसारु कां नेणा

durlabhare durlabhare durlabhu sansaru kan nena

दुर्लभरे दुर्लभरे दुर्लभु संसारु कां नेणा । आहारनिद्रेसाठीं दवडितां माणुसपणा ॥१॥ आड न विहिरी बावि न पोखरणी । सरिता ना सागर कल्पतरु रानोरानीं ॥२॥ बा याची खुण ज्ञानदेवो जाणे । तयाचें करणें तै अधिकचि होणें ॥३॥