भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जनाच्या संगें दुर्जनत्व प्राप्ती

durjanachya sangen durjanatva prapti

दुर्जनाच्या संगें दुर्जनत्व प्राप्ती । कैंचि त्या विश्रांती साधकाशी ॥१॥ सज्जन संगती करिता तेंचि रूप । आनंदाचा दीप बाणताती ॥२॥ दुर्जनाशी दिसे सर्व सृष्टी बद्ध । न दिसे कांहीं शुद्ध सर्वथैव ॥३॥ सज्जनांसी भासे विश्व पूर्ण मुक्तएकत्वी आसक्त न दिसती ॥४॥ सज्जनादुर्जनातीत जे निर्जन । तेथे संमर्जन ज्ञानेश्वर ॥५॥