भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजेपणींचा भावो

dujepanincha bhavo

दुजेपणींचा भावो । माझिये ठाउनि जावो । येर सकळिक वावो । म्यां त्याजियेला ॥१॥ माझें मी जाणें । अनु कांही नेणें । अनुभविये खुणें संतोषले ॥२॥ माझा मीचि श्रोता । माझा मीचि वक्ता । मीचि एकु दाता । त्रिभुवनीं ॥३॥ एकल्यानें एकला । अनंतरुपें देखिला । दुजेपणा मुकला । ज्ञानदेवो ॥४॥