भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजेपणीचा भावो आम्हां नाहीं ठावो

dujepanicha bhavo amhan nahin thavo

दुजेपणीचा भावो आम्हां नाहीं ठावो । सर्वी सर्व देवो आकारला ॥१॥ कैसें याचें करणें सांग आम्हां माय । कामधेनु होय कल्पनेची ॥२॥ नित्यसुखवेधें वेधली कामना । कृष्णीं कृष्णनयना एक तेजें ॥३॥ निवृत्ति साचार ज्ञानदेवीं आचार । कृष्णचि परिवार क्षरलासे ॥४॥