भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति

duhkhachi sangati | tichyathayin kon priti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥१॥ अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥ क्षणभंगुर ते ठाव । करूनि सांडावे चि वाव ॥२॥ तुका म्हणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥३॥