भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं

duhkh vate aisi aikoniyen goshti | jenen ghade tuti tujhya payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥ येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥ काय करूं देवा ऐसी नाहीं शक्ती । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥२॥ तुका म्हणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढें पिसे पांडुरंगा ॥३॥