भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुधावरिली साय निवडुनि दिधली

dudhavarili say nivaduni didhali

दुधावरिली साय निवडुनि दिधली । तैसी परी जाली आम्हां तुम्हां ॥१॥ धालों मी ब्रह्में उदार सब्रह्में । अनुदिनीं प्रेमें डुल्लतसे ॥२॥ नाठवे आशा देहावरी उदास । मीतूंपण भाष चोजवेना ॥३॥ रखुमादेविवर विठ्ठलीं मुरोनि राहिला । तो आनंदु देखिला संतजनीं ॥४॥