भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृष्टीचें सुख अंतरी देख

drushtichen sukh antari dekh

दृष्टीचें सुख अंतरी देख । ओंकार अरुष बोलताती ॥१॥ नादुले ऐकसी बिंदुले ते देखसी कोंदलें चौपासी सांवरेना ॥२॥ तें आतु न बाहेरी आणि अभ्यंतरी । एकलेंचि निर्धारी वर्ततसे ॥३॥ उफ़राटिये दृष्टी निवृत्तीच्या शेवटीं ज्ञानदेवा भेटी होऊनि ठेली ॥४॥