भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्य घेऊनियां कथा जरी करी । तरी भंगो हरी देह माझा

dravya gheuniyan katha jari kari | tari bhango hari deh majha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्रव्य घेऊनियां कथा जरी करी । तरी भंगो हरी देह माझा ॥१॥ माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा । तरी नारायण जिव्हा झडो ॥ध्रु.॥ साह्य तूं झालासी काय उणें तुपे । आणीक भूतांपे काय मागो ॥२॥ तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥३॥