भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं

dravya asatan dharma na kari | nagavila rajadvarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥१॥ माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥ कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥२॥ भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥३॥ तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥४॥