भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाठी केला अपघात

dorachya adharen parvat chadhala | paulasathi kela apaghat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाठी केला अपघात ॥१॥ अष्टोत्तरदशें व्याधि ज्या वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्ण जाला ॥ध्रु.॥ नव मास माया वाइलें उदरीं । ते माता चौबारीं नग्न केली ॥२॥ गायत्रीचें क्षीर पिळुनी घेऊनी । उपवासी बांधोनी ताडन करी ॥३॥ तुका म्हणे गुरु निंदकाचे तोंड । पहातां नरककुंड पूर्वजांसी ॥४॥