भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटी

doliyacha denkhana pahatanch dithi | dolach nighala dekhanya poti

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटी ॥१॥ डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपेआप तेथें झांकला डोळा ॥२॥ चोखा म्हणे नवलाव झाला । देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥