भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिव्य औषधीची वार्ता ऐकोनियां

divya aushadhichi varta aikoniyan

दिव्य औषधीची वार्ता ऐकोनियां कानीं व्याधी टाकी तनु । धालियाचे सुख भूकेला जेवि जाणे कैसे निवे त्याचे मनु रया ॥१॥ सुखाचा अनुभव कैसेनि जाणावा । भेटिचें आर्त सकळांसही सारिखें होईजे देखा ॥२॥ आपण झालिया जागा नलगे सांगावें । बापरखुमादेविवरविठ्ठल भेटलिया । तरि तुझीं तुटतील सकळिक विंदाने रया ॥३॥