भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीव दीपिका शशी तारा

div dipika shashi tara

दीव दीपिका शशी तारा होतुका कोटिवरीरे । परि नसरे निशि नुगवे दिवसु दिनकरनाथें जियापरीरे ॥१॥ नुध्दरिजे नुध्दरिजे नुध्दरिजे गोपाळेंविण नुध्दरिजे ॥ध्रु०॥ नगर भ्रमतां जन्म जावो परि प्रवेशु एक्या द्वारेरे । तैसा यजिजो भजिजो पूजिजो परि उकलु नंदाकुमरुरे ॥२॥ सर्वावयवीं शरीर सांग परि विरहित एका जिवेरे । तैसा धिक तो श्रोता धिक तो वक्ता जो वाळिला विठ्ठलदेवेरे ॥३॥ गळित शिर हें कलेवररे उदकेंविण सरिता भयंकररे । रविशशीविण अंबर तैसें हरिविण जिणें असाररे ॥४॥ अंत:करणीं रुक्मिणीरमणु परि त्या श्वपचाहि स्वरुपा बंधन नघडें नघडेरे । येरु यति होकां भलतैसा परि तो भव अगाडीहुनि न सुटे न सुटेरे ॥५॥ शिखिपक्षींपत्रींडोळे जेंवि अकाळ जळद पडळेरे । तैसीं गोकुळपाळकबाळेंविण कर्मे सकळेंविफ़ळेरे ॥६॥ यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे सकळ उपाय परि अपायरे । जंव तमाळनीळ सांवळा ह्रदयीं ठाण मांडूनि न र्‍हायेरे ॥७॥ मी उत्तम पैल हीनु भूतीं द्वेषाद्वेष ठेलेरे । केलोंनि कर्मे उफ़कां निफ़जे सुख तें दुरी ठेलेरे ॥८॥ आतां असोत हे भेदाभेद आम्ही असों एक्या बोधे रे । बापरखुमादेविवरु विठ्ठल निवृत्तिमुनिरायप्रसादेरे ॥९॥