भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीपीं दीप सामावे तेथें कैचा विचारु

dipin dip samave tethen kaicha vicharu

दीपीं दीप सामावे तेथें कैचा विचारु । राहिला निर्ध्दारु नाना मत्ता ॥१॥ जें जेथें होतें तें तेथें नाहीं । परतोनि काई पाहातोसि ॥२॥ मौनचिये मिठी सगळेंचि नाहीं । तैसा इंद्रियां दाही चोजवेना ॥३॥ ज्ञानदेवो बोले सामावलें मन । मन नायकती कान तेथील कथा ॥४॥