भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीनपण दवडूनि दिनानाथें मेळविलें

dinapan davaduni dinanathen melavilen

दीनपण दवडूनि दिनानाथें मेळविलें । ते येणें गोपाळें केलें रुप नवल वो माये ॥१॥ पाहातां पारणीं फ़िटली चक्षूंची । सर्व आवडीची कोथळी लाधली वो माये ॥२॥ आतां असो हे भरोवरी सांगणें या शरीरीं । उगवलें अंतरी दृष्टीचिया वो माय ॥३॥ गुण गिर्‍हाईक जोडला अमोल मोलें घेतला । रखुमादेविवर विठ्ठल वो माय ॥४॥