भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता

dinanatha tujhin briden charachar | ghesil kaivar sharanagata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥ आपुल्या दासांचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥२॥ चक्र गदा हातीं आयुधें अपारें । न्यून तेथें पुरें करूं धावें ॥३॥ तुका म्हणे तुज भक्तीचें कारण । करावया पूर्ण अवतारा ॥४॥