भजनी मालिका
← भजनांकडे परत

ढेंकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी

dhenkaren jevan dise sachen | nahin tari kachen kunthakunthi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ढेंकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥ हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥ गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥२॥ तुकां म्हणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥३॥