भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरोनी विश्वास राहिलेसें द्वारीं । नाम श्रीहरी आठवीत

dharoni vishvas rahilesen dvarin | nam shrihari athavit

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
धरोनी विश्वास राहिलेसें द्वारीं । नाम श्रीहरी आठवीत ॥१॥ कळेल तैसें करा जी दातारा । तारा अथवा मारा पांडुरंगा ॥२॥ मी तंव धरणें घेवोनी बैसलों । आतां बोलों येयापरी ॥३॥ चोखा म्हणे माझा हाचि नेम आतां । तुम्ही कृपावंत सिद्धि न्यावा ॥४॥