भजनी मालिका
← भजनांकडे परत

धांवत धांवत आलों नयनांजनीं

dhanvat dhanvat alon nayananjanin

धांवत धांवत आलों नयनांजनीं । प्रकाश दिनमणी उणा वाटे ॥१॥ निशी दिवस दोन्हीं नाहीं जेथ बारे । अर्धमात्रेवरी लक्ष ठेवीं ॥२॥ अक्षय अक्षर क्षरविरंहीत साजे । ज्ञानाचे जें ओझें चालेचीना ॥३॥ ज्ञानदेव चक्षु झाला परेवरी । यापरती बरोबरी नाहीं बापा ॥४॥