भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवावरील भार । काढूं नये कांहीं पर

devavaril bhar | kadhun naye kanhin par

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवावरील भार । काढूं नये कांहीं पर ॥१॥ तानभुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥ध्रु.॥ देखावी निंश्चिती । तोचि अंतर श्रीपती ॥२॥ वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥३॥