भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं

devanchya hi deva gopikanchya pati | udar he khyati tribhuvanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥१॥ पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्में महा दोष ॥ध्रु.॥ सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । रिद्धी सिद्धी ठायीं मुक्तिचारी ॥२॥ इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीत गातां छंद वातां टाळी ॥३॥ तुका म्हणे जड जीव शक्तीहीन । त्यांचें तूं जीवन पांडुरंगा ॥४॥