भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें

devakinandanen | kelen apulya chintanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें ॥१॥ मज आपुलिया ऐसें । मना लावूनियां पिसें ॥ध्रु.॥ गोवळे गोपाळां । केलें लावूनियां चाळा ॥२॥ तुका म्हणे संग । केला दुरि नव्हे मग॥३॥