भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें

devachya uddeshen jethen jethen bhav | to to vase thav vishvambharen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें ॥१॥ लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या ॥ध्रु.॥ शुद्ध भक्ती मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥२॥ तुका म्हणे ज्याचें तयासी च कळे । प्रांत येतो फळें कळों मग ॥३॥