भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते

devachya prasaden kara re bhojan | vhal kon kon adhikari te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥ ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ध्रु.॥ अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥२॥ इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघें चि आर्त पुरवितो ॥३॥ सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥४॥ तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगातें निरुपम ॥५॥