भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका थारा देऊं कोणी

devachya niropen pititon dangora | laje naka thara deun koni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका थारा देऊं कोणी ॥१॥ मोडिलें रांडेणे सुपंथ मारग । चालविलें जग यमपंथें ॥ध्रु.॥ परिचारीं केली आपुली च रूढी । पोटींची ते कुडी ठावी नाहीं ॥२॥ तुका म्हणे आणा राऊळा धरून । फजित करून सोडूं मग ॥३॥