भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचिये पायीं देई मना बुडी । नको धांवों वोढी इंद्रियांचे

devachiye payin dei mana budi | nako dhanvon vodhi indriyanche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाचिये पायीं देई मना बुडी । नको धांवों वोढी इंद्रियांचे ॥१॥ सर्व सुखें तेथें होती एकवेळे । न सरती काळें कल्पांतीं ही ॥ध्रु.॥ जाणें येणें खुंटे धांवे वेरजार । न लगे डोंगर उसंतावे ॥२॥ सांगणे तें तुज इतुलें चि आतां । मानी धन कांता विषतुल्य ॥३॥ तुका म्हणे तुझे होती उपकार । उतरों हा पार भवसिंधु ॥४॥